संताचा अतिक्रम – संत तुकाराम अभंग – 156
संताचा अतिक्रम ।
देवपूजा तो अधर्म ॥१॥
येती दगड तैसे वरी ।
मंत्रपुष्प देवा शिरीं ॥ध्रु.॥
अतीतासि गाळी ।
देवा नैवेद्यासी पोळी ॥२॥
तुका म्हणे देवा ।
ताडण भेदकांची सेवा ॥३॥
अर्थ
संतांचा अनादर करुण जो देवाची पूजा करतो तो अधर्माचरण करतो .देवावर मंत्रपठण करुण टाकलेली फुले दगडा प्रमाणे आहे .दारात आलेल्या भुकेल्या अतिथिला अन्न न देता देवाच्या नैवेद्याल पुरणपोळी करतो .तुकाराम महाराज म्हणतात, अश्या प्रकारची देवाची सेवा करणे म्हणजे देवाला दिलेली एक प्रकारचि शिक्षाच् आहे .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संताचा अतिक्रम – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.