तान्हेल्याची धणी – संत तुकाराम अभंग – 155

तान्हेल्याची धणी – संत तुकाराम अभंग – 155


तान्हेल्याची धणी ।
फिटे गंगा नव्हे उणी ॥१॥
माझे मनोरथ सिद्धी ।
पाववावे कृपानिधी ॥ध्रु.॥
तूं तों उदाराचा राणा ।
माझी अल्पचि वासना ॥२॥
कृपादृष्टीं पाहें ।
तुका म्हणे होईं साहे ॥३॥

अर्थ
तहानलेल्याने गंगेचे पाणी पिल्याने गंगाजल कमी होत नाही .हे कृपानीधी, माझे मनोरथ सिद्ध पावु देत .तू उदार राजा आहेस आणि माझे मागने अगदी थोडे आहेत .तुकाराम महाराज म्हणतात, तू फक्त माझ्याकडे कृपादृष्टिने पहा आणि मला मदत कर .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


तान्हेल्याची धणी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.