आणिकांची स्तुति आम्हां – संत तुकाराम अभंग – 154
आणिकांची स्तुति आम्हां ब्रम्हहत्या ।
एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥१॥
आम्हां विष्णुदासां एकविध भाव ।
न म्हणों या देव आणिकांसि ॥ध्रु.॥
शतखंड माझी होईल रसना ।
जरी या वचना पालटेन ॥२॥
तुका म्हणे मज आणिका संकल्पें ।
अवघींच पापें घडतील ॥३॥
अर्थ
आम्ही एका पांडुरंगाशिवाय इतरांची भक्ती व स्तुती केली तर आम्हांला ब्रम्हहत्येचे पातक लागेल .आम्ही विष्णुदास पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहोत, म्हणून अन्य देवतांना आम्ही मानत नाही .या वचनामध्ये मी जर खोट बोललो असेल तर माझ्या जिभेचे शंभर तुकडे होतील .तुकाराम महाराज म्हणतात, एका पांडुरंगाशिवाय इतर संकल्प माझ्या मनात प्रवेश करतील तर जगातील सर्व पापे मला लागतील .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
आणिकांची स्तुति आम्हां – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.