जेणें मुखें स्तवी – संत तुकाराम अभंग – 153

जेणें मुखें स्तवी – संत तुकाराम अभंग – 153


जेणें मुखें स्तवी ।
तेंचि निंदे पाठीं लावी ॥१॥
ऐसी अधमाची याती ।
लोपी सोनें खाय माती ॥ध्रु.॥
गुदद्वारा वाटे ।
मिष्टान्नांचा नरक लोटे ॥२॥
विंचु लाभेविण ।
तुका म्हणे वाहे शीण ॥३॥

अर्थ
तोंडावर एखादा स्तुती व पाठीमागे निंदा करतो अशी हिण मनोवृत्ती असणारा केवळ दुर्जनच आहे .तो स्वतःजवळील सोन्यासारखे अन्न लपवून माती खाणाकरा आहे . सुग्रास भोजन गुद्द्वारातुन नरक बनूनच बाहर पडते .तुकाराम महाराज म्हणतात, विंचवाला विषाचा काही उपयोग नसतानाही तो आपल्या नांगित विष सांभाळतो .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


जेणें मुखें स्तवी – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.