रडोनियां मान – संत तुकाराम अभंग – 150
रडोनियां मान ।
कोण मागतां भूषण ॥१॥
देवें दिलें तरी गोड ।
राहे रुचि आणि कोड ॥ध्रु.॥
लावितां लावणी ।
विके भीके केज्या दानी ॥२॥
तुका म्हणे धीरा ।
विण कैसा होतो हिरा ॥३॥
अर्थ
रडून, भुंकुन जर मान मागितला आणि समाजाने तो अनिच्छेने दिला, तर त्याला महत्त्व नाही .देवाने जे दिले आहे तेच गोड मानून समाधानी वृत्तीने राहतो .शेतातील धन्याचे दान आणि भिक मागून आणलेल्या धन्याचे दान यामध्ये फरक आहे . तुकाराम महाराज म्हणतात, जीवनात धीर, संयम धरल्यास हिर्याप्रमाने मोल प्राप्त होते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
रडोनियां मान – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.