मागील ते आटी – संत तुकाराम अभंग – 1476

मागील ते आटी – संत तुकाराम अभंग – 1476

 

मागील ते आटी येणें घडे सांग । सुतविल अंग एका सूत्रें ॥१॥
पहिपाहुणेर ते सोहळ्यापुरते । तेथुनि आरते उपचार ते ॥ध्रु.॥
आवश्यक तेथें आगळा आदर । चाली थोडें फार संपादतें ॥२॥
तुका म्हणे ॠण फिटे एके घडी । अलभ्य ते जोडी हातां आल्या ॥३॥

अर्थ :

ज्या वेळी हरी व मी एकच सूत्रात ओवले जाऊ त्यावेळी मी मागे केलेले अध्यात्मिक प्रयत्न यशस्वी झाले असे समजेन. पाहुणे हे केवळ सुखसोहळा पुरतेच असतात. परंतु हरीच्या सुखापुढे सर्वकाही मीच आहे. या कारणामुळे हरीच्या ठिकाणी आदर ठेवावा त्यामुळे अध्यात्मिक मार्ग थोडा सोपा होईल. तुकाराम महाराज म्हणतात हरी सारखा अलभ्य लाभ हातात आल्यानंतर सर्व लाभ आपोआप नाहीसे होतात.


वाचा : सार्थ  तुकाराम  गाथा 

अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.