ब्रम्हहत्या मारिल्या गाई – संत तुकाराम अभंग – 147

ब्रम्हहत्या मारिल्या गाई – संत तुकाराम अभंग – 147


ब्रम्हहत्या मारिल्या गाई ।
आणीक काई पाप केलें ॥१॥
ऐका जेणें विकिली कन्या ।
पवाडे त्या सुन्याचे ॥ध्रु.॥
नरमांस खादली भाडी ।
हाका हाडी म्हणोनि ॥२॥
अवघें पाप केलें तेणें ।
जेणें सोनें अभिलाषिलें ॥३॥
उच्चारितां मज तें पाप ।
जिव्हे कांप सुटतसे ॥४॥
तुका म्हणे कोरान्न रांड ।
बेटा भांड मागेना कां ॥५॥

अर्थ
जेणे आपली कन्येचा नवर्‍याला देउन तीचा सौदा केला त्याला ब्रम्‍हहत्या, गोहत्या यांसारखी पापे लागली कन्येचा नवर्‍याला देउन तीचा सौदा केला.त्याने नरमांस भक्षण केल्याप्रमाणे पाप त्याने केले आहे .सोन्याची अश्या धरली .आशा प्रकारच्या पापी लोकांचा उच्चार करतांना माझी जीभ कापते .तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारची पापे करण्यापेक्षा त्याने व त्याच्या बायकोने भिक मागून पोट भरावे .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


ब्रम्हहत्या मारिल्या गाई – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.