सार्थ तुकाराम गाथा

वैष्णव चोरटी- संत तुकाराम अभंग –1465

वैष्णव चोरटी- संत तुकाराम अभंग –1465


वैष्णव चोरटी । आलीं घरासी करंटी ॥१॥
आजि आपुलें जतन । करा भांडें पांघुरण ॥ध्रु.॥
ज्याचे घरीं खावें ।त्याचें सर्वस्वें ही न्यावें ॥२॥
तुका म्हणे माग । नाहीं लागों देत लाग ॥३॥

अर्थ

वैष्णव देहातील काम,क्रोध चोरणारे चोर आहेत व त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे ममत्व नसणारे ते करंटे आहेत व आज आपल्या घरी चोरी करण्यासाठी वैष्णव आले आहेत. त्यामुळे वैष्णवांचा पासून आपले भांडेकुंडे अंथरूण-पांघरूण सर्व जतन करा. चोरटे, करंटे वैष्णव ज्यावेळी देहरूपी घरात घुसतात व देहरूपी घरातील काम,क्रोध अशा प्रकारचे सर्व विकार चोरून नेतात. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव सर्वकाही चोरून नेतात व त्याचा मागमूसही लागू देत नाही याप्रमाणे वैष्णव भक्तांचे सर्व दुख चोरून नेतात


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

YouTube - Apps on Google Play

वैष्णव चोरटी- संत तुकाराम अभंग –1465

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *