दिवट्या वाद्य लावुनि खाणें – संत तुकाराम अभंग – 146

दिवट्या वाद्य लावुनि खाणें – संत तुकाराम अभंग – 146


दिवट्या वाद्य लावुनि खाणें ।
करूनि मंडण दिली हातीं ॥१॥
नवरा नेई नवरी घरा ।
पूजन वरा पाद्याचें ॥ध्रु.॥
गौरविली विहीण व्याही ।
घडिलें कांहीं ठेवूं नका ॥२॥
करूं द्यावें व्हावें बरें ।
ठायीचें कां रे न कळेचि ॥३॥
वर्‍हाडियांचे लागे पाठीं ।
जैसी उटि का तेलीं ॥४॥
तुका म्हणे जोडिला थुंका ।
पुढें नरका सामग्री ॥५॥

अर्थ
दिवट्यांचि आरास करुण, वाद्ये लावून, सुग्रास भोजन देवुन सुंदर मुलगी (वस्त्रालंकाराने नटलेली) वराला अर्पण करतात .आपल्या मुलीला घरी घेऊन जाणार म्हणून वराचे पाय धुतात .व्याही, विहिणीचा मानसन्मान करतात, काही कमी पडू देत नाहीत .वराकडिल मंडळी काशीही वागली तरी वाइट वाटून घेवू नये .विहीण मानसन्मानासाठी रागाऊन वर्‍हाडापाठीमागे धावते .तुकाराम माहाराज म्हणतात, लोकांचे असे आचरण म्हणजे नरकात जाण्याची व्यवस्था आहे .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


दिवट्या वाद्य लावुनि खाणें – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.