साळंकृत कन्यादान – संत तुकाराम अभंग – 145
साळंकृत कन्यादान ।
पृथ्वी दानाच्या समान ॥१॥
परि तें न कळे या मूढा ।
येईल कळों भोग पुढां ॥ध्रु.॥
आचरतां कर्म ।
भरे पोट राहे धर्म ॥२॥
सत्या देव साहे ।
ऐसें करूनियां पाहें ॥३॥
अन्न मान धन ।
हें तों प्रारब्धा आधीन ॥४॥
तुका म्हणे सोसे ।
दुःख आतां पुढें नासे ॥५॥
अर्थ
मुलीचे सळंकृत कन्यादान हे पृथ्वीदानाइतके महत्वाचे पूण्य आहे .या मुर्खाला”मुलीच्या बापाला” कन्येचा हुंडा घेउन होणारे पाप आज कळत नसले तरी पण पुढे ते पाप भोगताना कळते .धर्माचारणामुळे पोटहि भरते आणि धर्महि घडतो .सत्याने वागणाऱ्या मनुष्यास देवहि सहाय्य करतो याचा अनुभव तुम्ही घ्यावा .अन्न, धन, मानसन्मान प्रत्येकाला त्याच्या त्याच्या नाशिबाप्रमाने मिळतो .तुकाराम महाराज म्हणतात, कोणतीही अभिलाषा दुःखदायक आहे, त्याचा शेवटहि दुःखकारकच आहे .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
साळंकृत कन्यादान – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.