धीर नव्हे मनें- संत तुकाराम अभंग –1448
धीर नव्हे मनें । काय तयापाशीं उणें ॥१॥
भार घातलियावरी । दासां नुपेक्षील हरी ॥ध्रु.॥
याऐसी आटी । द्यावी द्रव्याचिये साटी ॥२॥
तुका म्हणे पोटें । देवा बहु केलें खोटें ॥३॥
अर्थ
खरेतर आपल्या जवळच धीर नाही नाहीतर देवाजवळ काय कमी आहे. देवावर आपल्या योग्य क्षैमाचा भार घातला की देव आपल्या दासांची कधीही उपेक्षा करीत नाही. धनप्राप्तीसाठी आपण किती कष्ट करतो तेवढेच कष्ट हरी प्राप्तीसाठी केले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात देवा खरे म्हणजे पोटासाठी आम्ही खोटे झालेलो आहोत.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
धीर नव्हे मनें- संत तुकाराम अभंग –1448
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.