सकळ पूजा स्तुति- संत तुकाराम अभंग –1447

सकळ पूजा स्तुति- संत तुकाराम अभंग –1447


सकळ पूजा स्तुति । करावी ते व्होवें याती ॥१॥
म्हणऊनि वारा जन । संतपूजा नारायण ॥ध्रु.॥
सेवावें तें वरी । दावी उमटूनि ढेंकरीं ॥२॥
तुका म्हणे सुरा । दुधा म्हणतां केवीं बरा ॥३॥

अर्थ

लोकांकडून पूजा स्तुती करून घेण्यास अधिकार योग्य असावा लागतो, योग्यता असावी लागते. त्या मुळे अयोग्य माणसे बाजूला सारून नारायण आणि संतांची पूजा करा. उत्तम प्रकारचे जेवण सेवन केल्यावर तृप्तीचा ढेकराणे जेवण करणाऱ्याच्या मुखावरील सुख लगेच समजते. तुकाराम महाराज म्हणतात दुधाला मद्य समजने व संतांना सामान्य समजणे योग्य होईल काय?


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

उपासा सेवटी अन्नासवे भेटी- संत तुकाराम अभंग –1447

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.