उदासीनाचा देह ब्रम्हरूप- संत तुकाराम अभंग –1442
उदासीनाचा देह ब्रम्हरूप । नाहीं पुण्य पाप लागत त्या ॥१॥
अनुताप अंगी अग्नीचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझों येत ॥ध्रु.॥
दोष ऐशा नावे देहाचा आदर । विटाळले अंतर अहंभावे ॥२॥
तुका म्हणे जाय नासोनियां खंती । तंव चि हे चित्तीं बद्धता ते ॥३॥
अर्थ
जे देहा विषयी उदास असतात ते ब्रम्हरूपच असतात. त्यांना पाप-पुण्य लागत नाही त्यांच्या अंगी वैराग्याच्या अग्निज्वाळा असतात प्रपंचाच्या मृगजळा ने ते विझत नाही. देहा विषय प्रेम म्हणजे पाप व देहांकाराने अंतकरण वितळते. तुकाराम महाराज म्हणतात जो पर्यंत चित्तातून प्रपंच त्याविषयी खंत गेलेली नसते तोपर्यंत चित्त बद्ध अवस्थेत असते.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
उदासीनाचा देह ब्रम्हरूप- संत तुकाराम अभंग –1442
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.