करावें गोमटें ।
बाळा माते तें उमटे ॥१॥
आपुलिया जीवाहूनी ।
असे वाल्हें तें जननी ॥ध्रु.॥
वियोग तो तिस ।
त्याच्या उपचारें तें विष ॥२॥
तुका म्हणे पायें ।
डोळा सुखावे त्या न्यायें ॥३॥
अर्थ
आपल्या बालाचे कल्याण व्हावे, अशी मातेची इच्छा असते .तिला आपले बाळ स्वतःच्या जीवापेक्षाही प्रिय असते .बाळाचा विरह झाले असता त्यावर केलेला सौख्यदायक उपचार तिला विषासमान वाटतात .तुकाराम महाराज म्हणतात, डोळ्याला थंडावा मिळण्यासाठी जसे तळपायाला लोणी लावतात, तसे आई-मुलाचे नाते आहे .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.