ते माझे सोयरे सज्जन – संत तुकाराम अभंग – 140

ते माझे सोयरे सज्जन – संत तुकाराम अभंग – 140


ते माझे सोयरे सज्जन सांगाती ।
पाय आठविती विठोबाचे ॥१॥
येरा मान विधि पाळणापुरतें ।
देवाचीं तीं भूतें म्हणोनियां ॥ध्रु.॥
सर्वभावें झालों वैष्णवांचा दास ।
करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची ॥२॥
तुका म्हणे जैसे आवडती हरीदास ।
तैशी नाहीं आस आणिकांची ॥३॥

अर्थ
जे विठ्ठल चरणांची सतत सेवा करतात ते माझे सोयरे, सोबती नातेवाइक आहेत .विश्वातील सर्व चरा चरांना मी वंदन करतो; कारण त्यांच्या मध्ये विठ्ठलाचा अंश आहे .जे-जे वैष्णव आहेत त्यांचा मी जीवाभावाने दास झालो आहे, त्यांच्या उच्छिष्टाची अपेक्षा मी करतो .तुकाराम महाराज म्हणतात, जे हरिचे दास आहे तेच मला आवडतात, इतरांची मला पर्वा नाही .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


ते माझे सोयरे सज्जन – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.