सुंदर ते ध्यान उभे विटेवरी – संत तुकाराम अभंग – 14
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसी हार गळां कासे पीतांबर ।
आवडे निरंतर हेंचि ध्यान ॥ध्रु.॥
मकरकुंडले तळपती श्रवणी ।
कंठी कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
अर्थ
अतिशय सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान, कमरेवर हात ठेऊन विटेवर उभे आहे .त्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे पीतांबर नसलेला आहे असे हे विठ्ठालाचे रूप मला नेहमीच आवडते .मसोळीच्या आकारची कुंडले त्याच्या कानात झळकत आहेत गळ्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे .तुकाराम महाराज म्हणतात की, हे ध्यान माझे सर्वसुख आहे असे सुशोभित ध्यान मी नेहमी आवडिने पाहीन.
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.