वचनें चि व्हावें आपण – संत तुकाराम अभंग –1386

वचनें चि व्हावें आपण – संत तुकाराम अभंग –1386


वचनें चि व्हावें आपण उदार । होईल विश्वंभर संपुष्ट चि ॥१॥
सत्यसंकल्पाचीं फळें बीजाऐसीं । शुद्ध नाहीं नासी पावों येत ॥ध्रु.॥
वंचिलिया काय येतसे उपेगा । शरीर हें नरकाचें चि आळें ॥२॥
तुका म्हणे जीव जितां थारे लावा । पडिलिया गोवा देशधडी ॥३॥

अर्थ

आपण आपल्या वाणीने विश्वंभरा चे नाम घेण्याविषयी उदार व्हावे. त्यामुळे विश्वंभर आपल्यावर नक्कीच संतुष्ट होईल. आपले संकल्प शुद्ध आणि सत्य असेल तर त्याचे फळ सत्य मिळते आणि जे शुद्ध आणि सत्य आहे ते केव्हाही नाश पावत नाही. आपले शरीर म्हणजे नरकाचे आळेच आहे आणि ते हरीच्या सेवेत लावले नाही तर त्याचा काय उपयोग आहे. तुकाराम महाराज म्हणतात याकरिताच मी तुम्हाला सांगत आहे की जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमचा देह तुम्ही हरिभजना कडे लावा जर तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला चौर्‍यांशी लक्ष योनी च्या फेऱ्यात गुंतावे लागेल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

वचनें चि व्हावें आपण – संत तुकाराम अभंग –1386

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.