चवदा भुवनें जयाचिये – संत तुकाराम अभंग – 138

चवदा भुवनें जयाचिये – संत तुकाराम अभंग – 138


चवदा भुवनें जयाचिये पोटीं ।
तोचि आम्हीं कंठीं साठविला ॥१॥
काय एक उणें आमुचिये घरीं ।
वोळंगती द्वारीं रिध्दिसिध्दी ॥ध्रु.॥
असुर जयाने घातले तोडरीं ।
आम्हांसी तो जोडी कर दोन्ही ॥२॥
रूप नाहीं रेखा जयासी आकार ।
आम्हीं तो साकार भक्तीं केला ॥३॥
अनंत ब्रम्हांडे जयाचिये अंगीं ।
समान तो मुंगी आम्हासाठीं ॥४॥
तुका म्हणे आम्ही देवाहूनि बळी ।
जालों हे निराळी ठेवुनि आशा ॥५॥

अर्थ
चौदा भुवनांचा जो जन्मदाता आहे, तो आमच्या कंठामध्ये नांदत आहे त्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, प्रत्यक्ष रिद्धि-सिद्धि आमच्या घरी नांदत आहे त्यामुळे आमच्या घरी काय कमतरता आहे .असुरांना बंदीवासात टाकणारा भगवंत आमच्यापुढे (भक्तापुढे) हात जोडून नम्रतेने उभा आहे .जो रंगरूपावाचुन निर्गुण निराकार आहे, त्याला आम्ही सगुन साकार बनविले आहे .जो अनेक ब्रह्मांडाचा जन्मदाता आहे, तो आमच्या साठी सूक्ष्मरूप धारण करतो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही (भक्त) देवाहुन भाग्यशाली आहोत; कारण आम्ही आशारहित भक्ती करत आहेत .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


चवदा भुवनें जयाचिये – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.