आम्ही देव तुम्ही देव – संत तुकाराम अभंग –1378

आम्ही देव तुम्ही देव – संत तुकाराम अभंग –1378


आम्ही देव तुम्ही देव । मध्यें भेव अधीक ॥१॥
कैवाडाच्या धांवा लागें । मागें मागें विठ्ठले ॥ध्रु.॥
भेडसाविलें हाके नादें । वोळखी भेदें मोडिली ॥२॥
तुका म्हणे उभा राहे । मागें पाहे परतोनि ॥३॥

अर्थ

लोकांनो तुम्ही आम्ही देव आहोत परंतु मध्ये संसाराचे भय निर्माण झाल्यामुळे जीवच राहिलो आहोत. निर्धारवंत संतांच्या मागे मागे तुम्ही धाव घ्या कारण ते जेथे जेथे असतात तेथे विठ्ठल त्यांच्या मागेमागे असतो. काळ आपल्याला आरोळी देऊन हाक मारत आहे आणि आपण भयभीत होत आहोत कारण आपण आपली ओळख विसरलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात अरे जीवा तू थोडा शांत उभा राहा आणि उपाधी पासून बाजूला हो मागे फिरून पहा मग तुला लक्षात येईल की तू जीव नसून ब्रम्‍ह आहेस.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

आम्ही देव तुम्ही देव – संत तुकाराम अभंग –1378

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.