धर्म रक्षावया साठीं – संत तुकाराम अभंग – 137
धर्म रक्षावया साठीं ।
करणें आटी आम्हांसि ॥१॥
वाचा बोलों वेदनीती ।
करूं संतीं केलें तें ॥ध्रु.॥
न बाणतां स्थिति अंगीं ।
कर्म त्यागी लंड तो ॥२॥
तुका म्हणे अधम त्यासी ।
भक्ति दूषी हरीची ॥३॥
अर्थ
या जगात आम्ही धर्मरक्षण करण्यासाठी श्रम करतो .आम्ही संतांप्रमाणे आचरण करून मुखाने वेदनीति बोलतो .परमार्थामध्ये ब्रम्हसस्थीतीला पोहचाण्यापूर्वीच कर्माचा त्याग केल्याचे जो ढोंग करतो, तो ढोंगी आहे .तुकाराम महाराज म्हणतात, जो हरिभक्तीला दुषणे देतो, तो अधम समजावा .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
धर्म रक्षावया साठीं – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.