संगतीनें होतो पंगतीचा – संत तुकाराम अभंग –1360

संगतीनें होतो पंगतीचा – संत तुकाराम अभंग –1360


संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥१॥
जैसी तैसी असो पुढिलांचें सोई । धरिती हाती पायी आचारिये ॥ध्रु.॥
उपकार नाहीं देखत आपदा । पुढिलांची सदा दया चित्तीं ॥२॥
तुका म्हणे तरीं सज्जनाची कीर्ती । पुरवावी आर्ती निर्बळांची ॥३॥

अर्थ

संतांच्या संगतीने त्यांच्या म्हणजे संतांच्या पंगतीचा लाभ होतो. परंतु नुसताच पंगतीचा लाभ होतो म्हणून त्यांची संगत करणे साधकाला अशोभनीय गोष्ट आहे. त्याकरिता ब्रम्‍ह रसाचा अनुभव येणे गरजेचे आहे. जसे असतील तसे पुढे गेलेल्या संतांच्या आधाराने चालावे त्यामुळे संत साधकाच्या हाताला धरून पुढे नेतात. जो खरा परोपकारी असतो त्याला दुसर्‍याचे दुःख दारिद्र्य पहावत नाही त्याच्या चित्तामध्ये नेहमी दया असते. तुकाराम महाराज म्हणतात संतांचे चित्तही तसेच असते ते नेहमी दुर्बळ भक्तांची मदत करतात.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

संगतीनें होतो पंगतीचा – संत तुकाराम अभंग –1360

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.