सोनियाचें ताट क्षीरीनें – संत तुकाराम अभंग – 135

सोनियाचें ताट क्षीरीनें – संत तुकाराम अभंग – 135


सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें ।
भक्षावया दिलें श्वानालागीं ॥१॥
मुक्ताफळहार खरासि घातला ।
कस्तुरी सुकराला चोजविली ॥ध्रु.॥
वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान ।
तयाची ते खुण काय जाणे ॥२॥
तुका म्हणे ज्याचें तोचि एक जाणे ।
भक्तीचें महिमान साधु जाणे ॥३॥

अर्थ
कुत्र्याला सोन्याच्या ताटात खीर खायला दिली .मौल्यवान मोत्यांचा हार गाढवाच्या गळ्यात घातला किंव्हा डुकराला कस्तूरिचा सुवास दिला .एखाद्या बहिर्‍याला ब्रम्‍हज्ञान सांगितले तर त्याला ते समजणार आहे का ? .तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला ज्या विषयाचे ज्ञान आहे, त्यालाच त्याचे महत्त्व कळणार, भक्ताची योग्यता संतांनाच समजणार .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


सोनियाचें ताट क्षीरीनें – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.