काय माझा पण होईल – संत तुकाराम अभंग –1347

काय माझा पण होईल – संत तुकाराम अभंग –1347


काय माझा पण होईल लटिका । ब्रिदावळी लोकां दाविली ते ॥१॥
खरी करूनियां देई माझी आळी । येऊनि कुरवाळी पांडुरंगे ॥ध्रु.॥
आणीक म्यां कोणा म्हणवावें हातीं । नये काकुलती दुजियासी ॥२॥
तुका म्हणे मज येथें चि ओळखी । होईन तो सुखी पायांनींच ॥३॥

अर्थ

हे देवा मी तुझी ब्रिदावळी म्हणजे‌ तू पतित-पावन आहेस दीनानाथ आहेस अशी केली आहे व अशी प्रतिज्ञा केली की तू भक्तवत्सल आहेस मग ती खोटी होईल काय? त्यामुळे पांडुरंगा मी तुझी जी ब्रिदावळी सर्व लोकांमध्ये केली आहे ती खरी करून दाखवा आणि माझी प्रतिज्ञा ही खरी कर. आणि माझ्याजवळ येऊन मला प्रेमाने कुरवाळ. मी तुझ्या वाचून कोणाचा आहे आश्रित म्हणून घेणार नाही आणि तुझ्या वाचून कोणालाही मी काकुळतीला येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात फक्त तुलाच मी ओळखत आहे आणि मी तुझ्या पायाच्या सुखाने सुखी होतो.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

काय माझा पण होईल – संत तुकाराम अभंग –1347

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.