आणिकांच्या कापिती माना – संत तुकाराम अभंग – 133

आणिकांच्या कापिती माना – संत तुकाराम अभंग – 133


आणिकांच्या कापिती माना ।
निष्ठुर पार नाहीं ॥१॥
करिती बेटे उसणवारी ।
यमपुरी भोगावया ॥ध्रु.॥
सेंदराचें दैवत केलें ।
नवस बोले तयासि ॥२॥
तुका म्हणे नाचति पोरें ।
खोडितां येरें अंग दुखे ॥३॥

अर्थ
जगात काही लोक आपल्या फायदयासाठी इतर लोकांच्या माना कापतात, त्यांच्या निष्ठुरणाला सीमा नसते .त्यांच्या या पापकृत्याने ते यमपुरीचि उसनवारि करतात .दगडाच्या देवाला शेंदुर फासुन त्याला नवस-सायास करतात .तुकाराम महाराज म्हणतात, दुसर्‍याला त्रास देणारी पोरे रात्री अंग दुखते म्हणून रडतात, त्याच प्रमाणे स्वता:च्या फायद्यासाठी इतरांना दुःखी करणारे लोक शेवटी दुःखच भोगतात .


अभंग विडिओ स्वरूपात पहा .


आणिकांच्या कापिती माना – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.