दिकची या नाहीं – संत तुकाराम अभंग –1321

दिकची या नाहीं – संत तुकाराम अभंग –1321


दिकची या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥१॥
तांतडींत करीं म्हणऊनि तांतडी । साधिली ते घडी सोनियाची ॥ध्रु.॥
संकल्पाच्या बीजें इंद्रियांची चाली । प्रारब्ध तें घाली गर्भवासीं ॥२॥
तुका म्हणे बीजें जाळुनी सकळ । करावे गोपाळ आपुले भाट ॥३॥

अर्थ

संसाराशी संबंध किती दिवस आहे याला मर्‍यादा नाही त्यामुळे संसारातील संसाराची भव रोगाची बाधा तुटेनाशी झाली आहे त्यामुळे मी तातडीने परमार्थ करीत आहे. जेवढा वेळ माझा परमार्थात जाईल तो एक वेळ म्हणजे माझ्यासाठी सोन्याचाच. संकल्प बीजाणे च इंद्रिये कर्म करत असतात व त्या क्रमानेच प्रारब्ध कर्म घडून पुन्हा गर्भवासाता नेऊन घालतात. तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे हे गोपाळा तुम्ही माझे सर्व प्रारब्धाची कर्मे जाळून टाकून मला तुमचे गुणगान करणारा भाट करावे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

दिकची या नाहीं – संत तुकाराम अभंग –1321

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.