पंडित वाचक जरी जाला पुरता ।
तरी कृष्णकथा ऐके भावें ॥१॥
क्षीर तुपा साकरे जालिया भेटी ।
तैसी पडे मिठी गोडपणें ॥ध्रु.॥
जाणोनियां लाभ घेई हा पदरीं ।
गोड गोडावरी सेवीं बापा ॥२॥
जाणिवेचें मूळ उपडोनी खोड ।
जरी तुज चाड आहे तुझी ॥३॥
नाना परिमळद्रव्य उपचार ।
अंगी उटी सारचंदनाची ॥४॥
जेविलियाविण शून्य ते शृंगार ।
तैसी गोडी हरीकथेविण ॥५॥
ज्याकारणें वेदश्रुति ही पुराणें ।
तेंचि विठ्ठलनाणें तिष्ठे कथे ॥६॥
तुका म्हणे येर दगडाचीं पेंवें ।
खळखळिचे अवघें मूळ तेथें ॥७॥
अर्थ
तू जगात पंडित अथवा प्रवचन कार झाला असलास तरी कृष्णकथा भक्तीभावाने ऐक . दूध, तूप आणि साखर यांच्या मिश्रण गोड होते प्रमाणे पंडित आणि श्रीकृष्ण कथा असेल तर कथा अधिक मधुर आहे .तुझ्या विद्वत्तेत कृष्णकथा मिसळून ती अधिक मधुर बनेल .तुला जर आपले हित साधायचे असेल तर जाणिवेच्या अहंकाराचे मुळापासून उच्चाटन करुण टाक .देहाच्या शृंगारासाठी सुगंधियुक्त चंदनऊटी उपयुक्त आहे .पण पोट भरले नसेल तर देहशृंगाराचा काही उपयोग नाही, तसे हरिकथेवाचुन विद्वत्ता काहीच कामाची नाही .ज्या प्रमाणे वेद, श्रुती, पुराणे यामध्ये विठ्ठलरूपाची संपत्ती समावली आहे.त्यामुळे त्यांना महत्त्व आहे .तुकाराम महाराज म्हणतात , तसे हरिकथेवाचून पांडित्य म्हणजे फक्त दगडांचे पेव आहे, ते उपसने म्हणजे व्यर्थ श्रमाची खळबळ आहे .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.