सार्थ तुकाराम गाथा

तरिच हा जीव संसारीं – संत तुकाराम अभंग –1319

तरिच हा जीव संसारीं – संत तुकाराम अभंग –1319


तरिच हा जीव संसारीं उदास । धरिला विश्वास तुम्हां सोई ॥१॥
एके जातीविण नाहीं कळवळा । ओढली गोपाळा सूत्रदोरी ॥ध्रु.॥
फुटतसे प्राण क्षणांच्या विसरें । हें तों परस्परें सारिखेंचि ॥२॥
तुका म्हणे चित्तीं राखिला अनुभव । तेणें हा संदेह निवारिला ॥३॥

अर्थ

देवा तुम्ही माझी उपेक्षा करणार नाही असा मी दृढविश्‍वास धरला आहे आणि त्या कारणामुळे मी संसाराविषयी उदास झालो आहे. दोन समान जातींचे व्यक्ती म्हणजे समान स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांना एकमेकांविषयी कळवळा असतो त्याप्रमाणे गोपाळा तुमची आणि माझी जात म्हणजे आपल्या दोघांचा स्वभाव एक सारखाच आहे. त्या कारणाने आपण प्रेम सुखाच्या दोरी ओढले गेलो आहोत. देवा तुमचा क्षणभर मला विसर पडला तर माझा जीव कासावीस होतो . अगदी त्याप्रमाणे तुम्हालाही माझा क्षणभर विसर पडला तर तुमचा देखील जीव कासावीस होतो हा तुमचा आणि माझा स्वभाव अगदी सारखाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझी आणि माझी जात एकच आहे म्हणजे स्वभाव एकच आहे याचा माझ्या चित्ताला अनुभव आला आहे, त्यामुळे माझ्या मनाचा संदेह निवारण झाला आहे, माझ्या मनात कोणत्याही प्रकारचा संशय राहिलेला नाही.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 

तरिच हा जीव संसारीं – संत तुकाराम अभंग –1319

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *