ब्रम्हनिष्ठ काडी – संत तुकाराम अभंग – 130
ब्रम्हनिष्ठ काडी ।
जरी जीवानांवें मोडी ॥१॥
तया घडली गुरुहत्या ।
गेला उपदेश तो मिथ्या ॥ध्रु.॥
सांगितलें कानीं ।
रूप आपुलें वाखाणी ॥२॥
भूतांच्या मत्सरें ।
ब्रम्हज्ञान नेलें चोरें ॥३॥
शिकल्या सांगे गोष्टी ।
भेद क्रोध वाहे पोटीं ॥४॥
निंदास्तुति स्तवनीं ।
तुका म्हणे वेंची वाणी ॥५॥
अर्थ
स्वताला जो ब्रम्हनिष्ठ म्हणवून घेतो त्याने प्राणिमात्रांच्या नावे हिरव्या गवताची काडी जरी मोडली तरी त्याला गुरु हत्येचे पातक लागते .गुरुने केलेला उपदेश खोटा ठरतो .गुरुने त्याच्या कानात ज्या ब्रम्हज्ञानाचा उपदेश केलेला असतो, त्या ब्रम्हरूपाची तो लोकांजवळ वाच्यता करतो .स्वतःला ब्रम्हज्ञानी महानवुन घेतो आणि भुत मात्रांचा द्वेष करतो.अश्या माणसांचे ब्रम्हज्ञान चोर पळवून नेतात .शिकलेल्या गोष्टी तो लोकांना सांगतो, पण भेदामुळे, क्रोध त्याच्या मनात वाहत असतो .तुकाराम महाराज म्हणतात, त्याची वाणी नेहमी लोकनिंदा, स्तुति-स्तवने यातच आपला वेळ व शक्ती तो खर्च करतो .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
ब्रम्हनिष्ठ काडी – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.