तारतिम वरी तोंडाच पुरतें – संत तुकाराम अभंग – 129
तारतिम वरी तोंडाच पुरतें ।
अंतरा हें येतें अंतरीचें ॥१॥
ऐसी काय बरी दिसे ठकाठकी ।
दिसतें लौकिकीं सत्य ऐसें ॥ध्रु.॥
भोजनांत द्यावें विष कालवूनि ।
मोहचाळवणी मारावया ॥२॥
तुका म्हणे मैंद देखों नेदी कुडें ।
आदराचे पुढें सोंग दावी ॥३॥
अर्थ
कपटी माणूस तोंडावर तारतंम्याने गोड बोलतो.त्याच्या अतःकरणातील भाव मला समजत आहे . लोकांमध्ये तुझो वागणे खरे आहे असे दिसून येते पण अशी फसवेगिरि बरी दिसती काय ?भोजनात विष कालवावे तसे तुझे गोड-गोड बोलने आहे.मनात मात्र मारण्याचा मोह आहे .तुकाराम महाराज म्हणतात, कपटी माणसाच्या अतःकरणातील कपट दिसून येत नाही वरवर आदराचे सोंग दाखवित असतो .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
तारतिम वरी तोंडाच पुरतें – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.