पतित मीराशी शरण – संत तुकाराम अभंग –1289
पतित मीराशी शरण आलों तुज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥१॥
तारियेले भक्त न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥ध्रु.॥
द्रौपदी बहिणी वैरीं गांजियेली । आपणाऐसी केली पांडुरंगा ॥२॥
प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार । माझा कां विसर पांडुरंगा ॥३॥
सुदामा ब्राम्हण दारिद्रे पीडिला । आपणाऐसा केला पांडुरंगा ॥४॥
तुका म्हणे तुज शरण निजभावें । पाप निर्दाळावें पांडुरंगा ॥५॥
अर्थ
पांडुरंगा मी तुझ्या सेवेचा वतनदारी जरी असलो तरी मी पतित आहे पापी आहे. त्यामुळे मी तुला शरण आलो आहे तरी, देवा तु माझी लाज राख, पांडुरंगा तु आजपर्यंत तुझ्या अनेक भक्तांचा उद्धार केलेला आहे तुझा अंतपार कोणालाही लागत नाही. मी एक मोठा थोर पापी आहे त्यामुळे हे देवा तू माझा उद्धार कर. हे देवा तुमची बहीण द्रोपदी राजसूय यज्ञात भोजन वाढत होती त्यावेळी तिच्या चोळीची गाठ सुटली त्यावेळी दुर्योधनाने तिची विटंबना केली परंतु तु तीच्या चोळीची गाठ बांधण्यासाठी तिला तुझ्यासारखे चतुर्भुज केले. पांडुरंगा प्रल्हादासाठी तू स्तंभातून अवतार घेतलास मग माझाच विसर तुला का पडला? देवा तुमचा मित्र सुदामा ब्राम्हण दरिद्रीने पिडला होता परंतु तुम्ही त्याला तुमच्यासारखे केले सोन्याची नगरी निर्माण करून तुम्ही त्याला तुमच्यासारखे श्रीमंत केले. तुकाराम महाराज म्हणतात मी तुम्हाला नीज भावे शरण आलेलो आहे त्यामुळे तुम्ही माझे पाप नाहीसे करा.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
पतित मीराशी शरण – संत तुकाराम अभंग –1289
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.