कुटुंबाचा केला त्याग – संत तुकाराम अभंग – 128
कुटुंबाचा केला त्याग ।
नाहीं राग जंव गेला ॥१॥
भजन तें वोंगळवाणें ।
नरका जाणें चुके ना ॥ध्रु.॥
अक्षराची केली आटी ।
जरी पोटीं संतनिंदा ॥२॥
तुका म्हणे मागें पाय ।
तया जाय स्थळासि ॥३॥
अर्थ
जोवर मनातून विषयकसक्ती दूर झाली नाही, तो पर्यंत स्त्री-पुत्र यांचा प्रपंच्याचा त्याग केला तरी काही अर्थ नाही .दुराचारी माणसाने केलेले भजन पाप युक्त असल्यामुळे वाईटच होय .त्यामुळे तो नरकवासच भोगणार, ते चुकणार नाही .अंत:करणात जर संतांची निंदा करण्याचा कितीही खटाटोप केली तरी ते व्यर्थ आहे .तुकाराम महाराज म्हणतात, अश्या माणसांची प्रगति होणार नाही.त्याचे पाय नाराकात ओढले जातील .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
कुटुंबाचा केला त्याग – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.