विठ्ठला विठ्ठला – संत तुकाराम अभंग –1278
विठ्ठला विठ्ठला । कंठ आळवितां फुटला ॥१॥
कारे कृपाळू न होसी । काय जाले मज विशी ॥ध्रु.॥
जाल्या येरझारा । जन्मां बहुतांचा फेरा ॥२॥
तुका म्हणे नष्टा । अबोलण्या तुझ्या चेष्टा ॥३॥
अर्थ
देवा, विठ्ठला विठ्ठला म्हणता म्हणता माझा कंठ फुटला आहे. मी हाक मारून देखील तू माझ्या विषयी कृपाळू का होत नाही. तुला माझ्याविषयी काय झाले आहे? देवा तुझ्यासाठी मी पुष्कळ येरझार्या घातल्या आहेत. तुकाराम महाराज म्हणतात अरे नाष्टा तू केलेल्या चेष्टा सांगण्यासारख्या नाहीत.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
विठ्ठला विठ्ठला – संत तुकाराम अभंग –1278
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.