अभिमानी पांडुरंग । गोवा काशाचा हो मग ॥१॥
अनुसरा लवलाहीं । नका विचार करूं कांहीं ॥ध्रु.॥
कोठें राहतील पापें । जालिया हो अनुतापें ॥२॥
तुका म्हणे ये चि घडी । उभ्या पाववील थडी ॥३॥
अर्थ
आपला अभिमान जर साक्षात पांडुरंग धरीत आहे तर मग आपल्याला अडचणच कशाची आहे? त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विचार न करता पांडुरंगाला लवकर शरण जावे .जर केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला तर पाप राहीलच कोठे ?तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्ही खर्या भक्तिभावाने पांडुरंगाला शरण गेलात तर तुम्हाला तो त्याच घटकेला उभ्या संसारातून पैलतीराला पोहोचवेल.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.