जाणे त्याचें वर्म नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥२॥
मैथुनाचें सुख सांगितल्या खूण । अनुभवाविण कळो नये ॥२॥
तुका म्हणे जळो शाब्दिक हें ज्ञान । विठोबाची खूण विरळा जाणे ॥३॥
अर्थ
जाणत्याचे वर्म आणि अज्ञानी माणसाची कर्म हे घडल्या वाचून त्यांचा अनुभव येत नाही .आणि विधीयुक्त कर्म केल्यावाचून कर्म धर्मरूप होत नाही. मैथुनाचे सुख सांगितल्यावर कळत नाही तर ते प्रत्यक्ष अनुभवानेच कळून येईल .तुकाराम महाराज म्हणतात जो म्हणतो की मी ब्रम्ह जाणले आहे त्या शब्दज्ञान्याला आग लागो आणि ज्याने विठोबाला साधले आहे तो सर्वांपेक्षा निराळाच आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.