काखे कडासन आड पडे ।
खडबड खडबडे हुसकलें ॥१॥
दादकरा दादकरा ।
फजितखोरा लाज नाहीं ॥ध्रु.॥
अवघा झाला राम राम ।
कोणी कर्म आचरे ना ॥२॥
हरीदासांच्या पडती पायां ।
म्हणती तयां नागवावें ॥३॥
दोहीं ठायीं फजीत झालें ।
पारणें केलें अवकळा ॥४॥
तुका म्हणे नाश केला ।
विटंबिला वेश जेणे ॥५॥
अर्थ
एक कर्मठ ब्रम्हच्याऱ्याच्या बगलेत हरणाचे कातडे होते.वाटेत अडखळल्यामुळे ते खाली आडवे पडले आणि खडबड खडबड असा आवाज झाला .तो ब्रम्हचारी, अश्या फजितखोरांना मुळात लाज लज्याच नाही वा त्याची तूम्ही काही तरी दाद करा त्याची चांगली फजीती करा . तो ब्रम्हचारी म्हणु लागला की,देहु मध्ये सर्व जण मुखाव्दारे रामराम असेच म्हणतात कुणीही कर्माचरण आचरित नाही .तो म्हणतो हरिदासांच्या चरणावर जे मस्तक ठेवतात, त्यांना नागवावे .दोन्ही ठिकाणी(संसार व परमार्थ) फजीती झाल्यामुळे त्यांना अवकाळा प्राप्त झाली आहे .तुकाराम महाराज म्हणतात, या ब्रम्हचारी लोकांनी ब्रम्हचारी वेषाची वीटंबना केली आहे आणि स्वत:चा नाश करून घेतला आहे .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.