शरणागत झालों – संत तुकाराम अभंग – 126

शरणागत झालों – संत तुकाराम अभंग – 126


शरणागत झालों ।
तेणें मीपणा मुकलों ॥१॥
आतां दिल्याचीच वाट ।
पाहों नाहीं खटपट ॥ध्रु.॥
नलगे उचित ।
कांहीं पाहावें संचित ॥२॥
तुका म्हणे सेवा ।
माने तैसी करूं देवा ॥३॥

अर्थ
हे देवा आहो मी तुम्हला पूर्ण पणे सर्व भावे शरणागत झालो आहे त्यामुळे मी माझ्या मीपणाला मुकलो आहे.आता तुम्ही मला जे काही दिले आहे त्याची वाट पाहणे व दुसरी कोणतीही खटपट न करणे.माझ्या संचिता प्रमाणे काय होईल ते होईल यात उचीत काय ते पाहण्याची जरुरी नाही.तुकाराम महाराज म्हणतात जशी तुला मान्य होईल तशीच सेवा मी आता करेल.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

 


शरणागत झालों – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.