संत तुकाराम अभंग

न देखोनि कांहीं – संत तुकाराम अभंग – 125

न देखोनि कांहीं – संत तुकाराम अभंग – 125


न देखोनि कांहीं ।
म्या पाहिलें सकळ ही ॥१॥
झालों अवघियांपरी ।
मी हें माझें ठेलें दुरी ॥ध्रु.॥
न घेतां घेतलें ।
हातें पायें उसंतिलें ॥२॥
खादलें न खातां ।
रसना रस झाली घेतां ॥३॥
न बोलोनि बोलें ।
केलें प्रगट झांकिलें ॥४॥
नाइकिलें कानीं ।
तुका म्हणे आलें मनीं ॥५॥

अर्थ
काही न पाहता मी विश्वातील सर्व पाहत आहे .कारण मी माझा देहभान, देहबुध्दी विसरलो आणि विश्वतत्त्वाशी एकरूप झालो आहे .म्हणून मी विश्वातील सर्व वास्तु पाहू शकलो व् स्थुल देहाच्या हात व पायांनी ज्याचा त्याग केला आहे ते सर्व स्वस्वरुपात मिळाले आहे .काही न खाता सर्व भोजनांचा रसस्वाद घेतला आहे .कुणाशी न बोलता सर्वांशि बोललो आहे आणि जे गुप्त आत्मज्ञान होते ते उघड केले आहे .तुकाराम महाराज म्हणतात, कानांनी जे एकता नाही आले ते सर्व आइकले आहे.ही आत्मस्वरूपाची ओळख आहे .


अभंग विडिओ स्वरूपात पहान्यासाठी पुढील लिंकवर जा.

https://youtu.be/nW7vFQ11wGM


न देखोनि कांहीं – संत तुकाराम अभंग

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *