चुंबळीशीं करी चुंबळीचा संग ।
अंगीं वसे रंग क्रियाहीन ॥१॥
बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं ।
परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ध्रु.॥
माकडाच्या गळां रत्न कुळांगना ।
सांडूनियां सुना विधी धुंडी ॥२॥
तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी ।
फजिती ते व्हावी आहे पुढें ॥३॥
अर्थ
हीन वृत्तीच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तिला हीन लोकांची संगती आवडते .जसे बीज तसे फळ मिळते, त्याप्रमाणे ज्याची कीर्ती असेलत्याचा सुगंध त्रिलोकात पसरतो .जसे माकडाच्या गळ्यात रत्नहार घातला तरी माकडाला त्याची किम्मत नसते तसेच सुंदर पत्नी सोडून एखादा मनुष्य वेश्येचे घर शोधतो.तुकाराम महाराज म्हणतात अश्या मनुष्याला जन्म देणारी माता गाढवी आहे,त्याची पुढे फजीती होण्यासाठीच तिने त्याला जन्माला घातले आहे .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.