सुख सुखा भेटे – संत तुकाराम अभंग –1219
सुख सुखा भेटे । मग तोडिल्या न तुटे ॥१॥
रविरश्मिकळा । नये घालितां पैं डोळां ॥ध्रु.॥
दुरि तें जवळी । स्नेहें आकाशा कवळी ॥२॥
तुका म्हणे चित्त । माझें पायीं अखंडित॥३॥
अर्थ
परमात्मा आणि सुखरूप जीव हे दोन्ही सुखी आहेत सुखाचेच ते रूप आहेत आणि एकमेकांना ते भेटले की त्यांना कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरीही ते तुटत नाहीत. सूर्याची किरणे सूर्य पासून वेगळी करून त्यांना आपल्या डोळ्यांमध्ये घालता येत नाही. एखादा मनुष्य आपल्यापासून दूर जरी असला तरी तो स्नेहाने आपल्या जवळच येतो. त्याप्रमाणे प्रेमाने आकाशाला देखील कवळी घालता येते .तुकाराम महाराज म्हणतात माझे चित्त अखंडितपणे देवाच्या चरणी मी राखणार.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
सुख सुखा भेटे – संत तुकाराम अभंग –1219
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.