कोणा चिंता आड – संत तुकाराम अभंग –1215

कोणा चिंता आड – संत तुकाराम अभंग –1215


कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड ॥१॥
कैंचा राम अमागिया । करी कटकट वांयां ॥ध्रु.॥
स्मरणाचा राग । क्रोधें विटाळलें अंग ॥२॥
तुका म्हणे जडा । काय चाले या दगडा ॥३॥

अर्थ

काही गरिबांना परमार्थ करण्या विषय संसाराची चिंता आड येते, तर काही श्रीमंतांना संसाराची चिंता नसली तरी लोकलज्जा परमार्थ करण्यासाठी नडते. अशा अभागी माणसाच्या तोंडाला रामाचे नाम कधी येणार? मात्र हे संसारीक वटवट करत असतात .एखाद्याने जर उपदेश केला की तु हरीचे स्मरण कर तर त्याला राग येतो कारण त्यांच्या शरीर क्रोधाने वीटाळलेले असते. तुकाराम महाराज म्हणतात अशा जड दगडा पुढे बोलण्यात काय अर्थ आहे त्यामुळे अशा मूर्ख माणसांपुढे गप्प राहणे योग्य आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

कोणा चिंता आड – संत तुकाराम अभंग –1215

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.