बखयांबरवंट । विटे चरण सम नीट ॥१॥
ते म्या हृदयीं धरिले । तापशमन पाउलें ॥ध्रु.॥
सकळ तीर्था अधिष्ठान । करी लक्ष्मी संवाहन ॥२॥
तुका म्हणे अंती । ठाव मागितला संती ॥३॥
अर्थ
हरीचे चरण विटेवर समान आहेत आणि ते सौंदर्याला ही सौंदर्य देणारे आहेत .आणि ते चरण मी माझ्या हृदयात धारण केले आहे आणि हरिचरण त्रिविध तापांचे क्षालन करणारे आहेत .सर्व तीर्थांचे अधिष्ठान हरिचे चरण आहेत त्यांची सेवा लक्ष्मी करत असते. “तुकाराम महाराज म्हणतात संतांनी शेवटी विठोबाच्या समचरणाच्या ठिकाणी ठाव मागितला आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.