शुद्ध ऐसें ब्रम्हज्ञान । करा मन सादर ॥१॥
रवि रसां सकळां शोषी । गुणदोषीं न लिंपे ॥ध्रु.॥
कोणासवें नाहीं चोरी । सकळांवरी समत्व ॥२॥
सत्य तरी ऐसें आहे । तुका पाहे उपदेशीं ॥३॥
अर्थ
शुद्ध ब्रम्हज्ञान कसे असते ते मी तुम्हाला सांगतो तुम्ही मन सावध करू ऐका .सूर्य पृथ्वीवरील सर्व चांगल्या व वाईट रसांचे शोषण करतो पण तो त्यांच्या गुणदोषांनी लिप्त होत नाही. सूर्य कोणाचाही भेदभाव न करता सर्वांसाठी सारखाच असतो. तुकाराम महाराज म्हणतात शुद्ध ब्रम्ह ज्ञानाचे सत्य म्हणजे अगदी सूर्याप्रमाणे असते, नाही तर खोट्या ब्रम्हज्ञानाला पाहुन तुम्ही फसला म्हणून मी तुम्हाला उपदेश करत आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.