संतांचे गुण दोष आणितां – संत तुकाराम अभंग – 121
संतांचे गुण दोष आणितां या मना ।
केलिया उगाणा सुकृताचा ॥१॥
पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ ।
चिरोनि केळी केळ गाढव तो ॥ध्रु.॥
तुका म्हणे गंगे अग्नीसि विटाळ ।
लावी तो चांडाळ दुःख पावे ॥२॥
अर्थ
संतसज्जनांचे बाह्यात्कारि वर्तन पाहुन एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की त्याची पुण्याई नष्ट होते .जसे एखादा मनुष्य फुलाचा सुगंध हुंगन्यासाठी फुलाचा चोळामोळा करतो आणि केळयांचा घड पाहण्यासाठी केळीचे झाड मोडतो .तुकाराम महाराज म्हणतात, गंगा आणि अग्नी यांना जो विटाळ मानतो, तो चंडाळ समजावा .
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संतांचे गुण दोष आणितां – संत तुकाराम अभंग
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.