संत गाती हरीकीर्त्तनी – संत तुकाराम अभंग –1208
संत गाती हरीकीर्त्तनी । त्यांचें घेइन पायवणी ॥१॥
हेचि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें ॥ध्रु.॥
काया कुरवंडी करीन । संत महंत ओंवाळीन ॥२॥
संत महंत माझी पूजा । आन भाव नाहीं दुजा ॥३॥
तुका म्हणे नेणें कांहीं । अवघें आहे संतापायीं ॥४॥
अर्थ
जे संत हरिकीर्तन करतात हरि गुण गातात त्यांचे चरण क्षालन करून ते तीर्थ मी प्राशन करणे. हेच माझे तप आणि हेच माझे तीर्थ आहे. या वाचून मी दुसरे काही जाणणार नाही. मी संत महंत यांना माझ्या शरीराची कुरवंडी करून ओवाळीन. मी संत महंताची पूजा करतो या वाचून माझ्या मनात दुसरा भक्तिभावच नाही .तुकाराम महाराज म्हणतात मी संत आणि महंत सोडून दुसरे काही जाणत नाही कारण संतांच्या चरणी सर्वकाही आहे
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत गाती हरीकीर्त्तनी – संत तुकाराम अभंग –1208
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.