उत्तम त्या याति – संत तुकाराम अभंग –1203

उत्तम त्या याति – संत तुकाराम अभंग –1203


उत्तम त्या याति । देवा शरण अनन्यगति ॥१॥
नाहीं दुजा ठाव । कांहीं उत्तम मध्यम भाव ॥ध्रु.॥
उमटती ठसे । ब्रम्हप्राप्ति अंगीं दिसे ॥२॥
भाविक विश्वासी । तुका म्हणे नमन त्यांसी ॥३॥

अर्थ

जे देवाला शरण जातात त्यांच्या जाती उत्तम आहेत म्हणजे जे हरी भक्त आहेत ते उत्तम जातीचे आहेत याचा अर्थ असा होतो की हरिभक्त उत्तम जातीचे आहेत मग ते कोणत्याही वर्णात जन्माला आलेले असेल तरी काही हरकत नाही. त्यांच्या मनामध्ये दुसऱ्याविषयी कधीही उत्तम ,मध्यम आणि कनिष्ठ असा भेदभाव नसतो .जे हरिभक्त हरीला अनन्यगतीने शरण जातात त्यांच्या अंगी वेगवेगळे तेज उमटलेले असते .आणि त्यावरून त्यांना ब्रम्‍ह प्राप्ती झाली अशी लक्षणे त्यांच्या अंगी उमटलेले दिसतात. तुकाराम महाराज म्हणतात जे असे भाविक आहेत म्हणजे निष्ठावंत हरिभक्त आहेत त्यांना मी नमन करतो आहे.


अभंग विडिओ स्वरूपात पहा .

उत्तम त्या याति – संत तुकाराम अभंग –1203

संत  तुकाराम अँप डाउनलोड रा.