काय देवें खातां – संत तुकाराम अभंग –1202
काय देवें खातां घेतलें हातींचें । आलें हें तयाचें थोर भय ॥१॥
म्हणतां गजरें राम एकसरें । जळती पापें थोरें भयधाकें॥ध्रु.॥
काय खोळंबले हात पाय अंग । नाशिलें हें सांग रूप काय ॥२॥
कोण लोकीं सांग घातला बाहेरी । म्हणतां हरी हरी तुका म्हणे॥३॥
अर्थ
अरे तू हरीचे नाम घेत आहे म्हणून, देवाने तु काही खात आहे किंवा खात असताना तुझ्या हातून काही ओढून घेतले आहे काय ?नाही ना मग देवाचे नाम घेण्यासाठी घाबरण्याचे काय कारण ?रामनामाचा जप तु एकदम गर्जून म्हणजे मोठ्या भक्तिभाव पूर्ण श्रद्धेने घेतले तर सर्व पापे नामाच्या भयाने जळून जातात .हरीचे नाम घेत असताना तुझे हात पाय बंद पडतात काय किंवा तुझ्या सौंदर्यामध्ये काही बिघाड होतो काय ?तुकाराम महाराज म्हणतात तु हरी म्हणत असताना कोणीही तुला धर्माच्या बाहेर काढले काय? ते तरी सांग.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
काय देवें खातां – संत तुकाराम अभंग –1202
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.