सुखाचे व्यवहारीं – संत तुकाराम अभंग –1201
सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला । आनंदें कोंदला मागें पुढें ॥१॥
संगती पंगती देवासवें घडे । नित्य नित्य तेंचि साच ॥ध्रु.॥
समर्थाचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी कथा कासयाची ॥२॥
तुका म्हणे येथें लाभाचिया कोटी । बहु वाव पोटीं समर्थाचे ॥३॥
अर्थ
नामसंकीर्तनाच्या सुखकारक व्यवहाराने इतक्या सुखाचा लाभ झाला आहे की मागे पुढे सर्व आनंदच दाटला आहे. आता आम्हाला देवा संगे आणि देवाच्या संगतीत त्याच्या पंक्तीत बसण्याचा योग घडतो आहे आणि हा लाभ मर्यादित काळा पुरता नसून नित्य नित्य म्हणजे रोज रोज लाभत आहे. देव सर्वसमर्थ आहे आणि त्याच्या घरी सर्व संपदा आहे त्यामुळे आम्हाला कशाचीही कमतरता नाही. तुकाराम महाराज म्हणतात समर्थांच्या घरी देवाच्या घरी कोट्यावधी लाभ होतात आणि समर्थांच्या पोटी मोठा वाव(जागा) आहे.
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
सुखाचे व्यवहारीं – संत तुकाराम अभंग –1201
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.