हरिच्या जागरणा – संत तुकाराम अभंग – 12
हरिच्या जागरणा ।
जातां कां रे नये मना ॥१॥
कोठें पाहासील तुटी ।
आयुष्य वेंचे फुकासाठी ॥२॥
ज्यांची तुज गुंती ।
ते तों मोकलिती अंतीं ॥२॥
तुका म्हणे बरा ।
लाभ काय तो विचारा ॥३॥
अर्थ
हरिचे नामस्मरण करने, भक्ति करने हे तुझ्या मनात का बरे येत नाही? .या संसारामधे तुझे जीवन व्यर्थ जात आहे, ती तूट भरून निघणार नाही .ज्यांच्यासाठी तू आपले आयूष्य व्यर्थ घालवित आहे, ते तुला शेवट पर्यंत साथ देणार नाहीत.तुकाराम महाराज म्हणतात , की तू आपल्या जीवनाचे सार्थक कश्यामध्ये आहे याचा विचार कर .
हा अभंग विडिओ स्वरूपात पहा .
हरिच्या जागरणा – संत तुकाराम अभंग
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.