माझा स्वामी तुझी – संत तुकाराम अभंग –1198
माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥१॥
तीर्थे तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥२॥
तुका म्हणे तुम्ही देवा द्विजवंद्य । मी तों काय निंद्य हीन याती ॥३॥
अर्थ
ज्यावेळी चिंचवडच्या गणपतीस प्रार्थना करून महाराजांनी भोजन करविले आणि देव त्यांच्या विनंतीस मान देऊन भोजन करण्यास आले वमककगगग जेवण झाल्यावर तेथील चिंतामणी ब्राम्हणांनी तुकाराम महाराजांची स्तुती करण्यास सुरुवात केली त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले अहो चिंतामणी देवा माझा स्वामी पांडुरंग तुम्हा ब्राम्हणांची लाथ त्याच्या छातीवर धारण करतो मग माझ्यासारख्या पतीताचे तेथे काय चालणार आहे? माझ्यासारखा पतीत कोण लागून गेला ?अहो ब्राम्हण देवा तुमच्या चरणस्पर्शाने तिर्थे पवित्र होतात मग माझ्यासारख्या दुर्बळाचा तेथे काय अधिकार आहे ?तुकाराम महाराज म्हणतात अहो चिंतामणी देवा तुम्ही ब्राम्हण देवालाही वंद्य आहात मी हिन जातीत जन्माला आलो आहे .(अशा प्रकारचे विनयपूर्वक भाष्य तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या गणपतीची सेवा करणाऱ्या चिंतामणी ब्राम्हण देवास केले.)
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
माझा स्वामी तुझी – संत तुकाराम अभंग –1198
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.