चिंतामणिदेवा – संत तुकाराम अभंग –1196
चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥१॥
देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥ध्रु.॥
वाडवेळ जाला सिळें जालें अन्न । तटस्थ ब्राम्हण बैसलेती ॥२॥
तुका म्हणे देवा तुमच्या सुकृतें । आणीन त्वरित मोरयासी ॥३॥
अर्थ
अहो चिंतामणी देवा तुमचे दैवत गणपती यांना जेवण्यास बोलवा आणि दुसरे पात्र तुमच्या शेजारी टाकून त्यांना भोजन करण्यास बसवा .त्यावेळी चिंतामणी म्हणाले अहो तुकोबा आमची एवढी मोठी थोरवी कसली आमची तर अभिमानाने फजिती झाली आहे.खूप उशीर झाला होता अन्न शिळे होत चालले होते ब्राम्हण आपल्या ताटावर तसेच तटस्थ बसलेले आहेत. तुकाराम महाराज म्हणतात अहो चिंतामणी देवा मी तुमच्या पुण्याइने देवाला गणपती रायाला बोलावुन आनु शकतो आणि खरोखर महाराजांनी विनंती करतातच पांडुरंग राया गणपतीच्या अवतारात तेथे आले. .(तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या चिंतामण पूजार्यांच्याशी हे भाषण केले आहे तेच ह्या अभंगात आहे.)
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
चिंतामणिदेवा – संत तुकाराम अभंग –1196
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.